Bride / Groom Form

वडवणी तालुका तेली समाज संघटनेच्या वतीने धुळे येथील घटनेच्या निषेधार्थ वडवणी तहसीलदार यांना निवेदन

23 February 2018 Teli samaj 77 views

      वडवणी तालुका जिल्हा- बीड - धुळे जिल्हयातील दोंडाईच्या येथील पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणार्या नराधमावर कारवाई करण्याबाबत तहसीलदार वडवणी यांना  तेली समाज  संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. दोंडाईच्या येथील घडलेल्या तेली समाजाच्या बालीकेवर झालेल्या अत्याचाराचा तसेच सदर घटना दाबण्यासाठी संबंधित स्थानिक शालेय संस्था ज्ञानोपासक शिक्षण संस्था मंडळ संचालित संस्था नूतन माध्यमिक विद्यालय या शाळेच्या संस्थाचालकांनी व राजकारण्यांनी निर्माण केलेल्या दबावाचा तीव्र निषेध करित आहोत पिडीत बालीकेच्या आई वडीलांना धमकवनार्या व आमिष दाखवनार्या संस्था चालकांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी.बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना घृणास्पद असून माणुसकिला काळिंबा फासणारी आहे .तरी बालिकेवर अत्याचार करणार्या व त्यास पाठिशी घालणार्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करित आहोत.अत्याचार प्रकरणी बालिकेच्या कुटुंबावर  दबाव कायम असून शिक्षण व संस्थाचालकाच्या समर्थकांकडून त्यांना सतत भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला जात आहे. त्यामुळे हे कुटुंब दहशतीखाली आहे.त्यांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी करीत आहोत.

          याप्रसंगी समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक माजी पंचायत समिती सदस्य आंकुशराव पेशवे,गणेश क्षीरसागर,किशोर नांदुरकर,दत्तात्रय पेशवे,नितीन नांदुरकर,बाळासाहेब पेशवे,ऊतरेश्वर नांदुरकर,गणेशराव शिंदेबालाजी नांदुरकर,बाबासाहेब पेशवे,आतुल नांदुरकर,अनील नांदुरकर,रमेश नांदुरकर,सखाराम सोनटक्के,अंगद नांदूरकर,तसेच पत्रकार बाबुराव जेधे,जानकराम आदि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wadwani Teli Samaj sangathan Request Tehsildar

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Umarga Teli Samaj Organization protest against Dhule atyachar