वधु - वर फॉर्म

लोहारा तालुका तेली समाज संघटनेच्या वतीने बालिकेवर अत्याचार प्रकरणी कारवाईची मागण्‍ाी

23 February 2018 Teli samaj 58 views

            लोहारा  दि.२१(प्रतिनिधी)- धुळे जिल्हयातील दोंडाईच्या येथील पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणार्यावर कारवाई करण्याबाबत लोहारा तहसीलदार शोभा पुजारी यांना लोहारा  तालुका तेली समाज संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. दोंडाईच्या येथील घडलेल्या तेली समाजाच्या बालीकेवर झालेल्या अत्याचाराचा तसेच सादर घटना दाबण्यासाठी संबंधित स्थानिक शालेय संस्था ज्ञानोपासक शिक्षण संस्था मंडळ संचालित संस्था नूतन माध्यमिक विद्यालय या शाळेच्या संस्थाचालकांनी व राजकारण्यांनी निर्माण केलेल्या दबावाचा तीव्र निषेध करित आहोत पिडीत बालीकेच्या आई वडीलांना धमकवनार्या व आमिष दाखवनार्या संस्था चालकांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी.बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना घृणास्पद असून माणुसकिला काळिंमा फासणारी आहे .तरी बालिकेवर अत्याचार करणार्या व त्यास पाठिशी घालणार्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली. अत्याचार प्रकरणी बालिकेच्या कुटुंबावर कुटुंबावर दबाव कायम असून शिक्षण व संस्थाचालकाच्या समर्थकांकडून त्यांना सतत भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला जात आहे. त्यामुळे हे कुटुंब दहशतीखाली आहे.त्यांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली यावेळी जिल्हा सचिव अँड विशाल साखरे तालुकाध्यक्ष भिमाशंकर डोकडे,उपाध्यक्ष उमाशंकर कलशेट्टी,प्रमोद बंगले,मल्लिकार्जुन कलशेट्टी,सचिन ठेले,गोविंद बंगले,उमेश जवादे,नाना बंगले,मिलिंद बंगले,गणेश खबोले,सुवन डोकडे, आदि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.   

Lohara Teli Samaj Wanted Take Action Against Abuse

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाजाची राजकीय ताकद - विदर्भातील तेली समाजाचे राजकीय वर्चस्व | Political Power of Teli Samaj