Bride / Groom Form

दोंडाईच्या बलात्कार प्रकरणी तेली समाज भंडारा यांचे जिल्हाधिकार्‍यांना निषेध निवेदन

24 February 2018 Teli samaj 88 views

     धूळे जिल्ह्यातील दोंडईयचा शहरात नुतन महाविद्यालयात शाळेत तेली समाजाच्या ५ वर्षिय बालीकेवर बलात्कार करण्यात आला. त्याचा निषेध म्हणून व आरोपीवर कठोर कार्यवाही होवून फाशीची शिक्षा व्हावी. या मागणीसाठी अखिल भारतीय तैलिक साहू महासभा नवी दिल्ली, महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभा जिल्हा भंडारा तसेच संताजी यूवा सेना भंडारा तर्फे निवेदन मा.जिल्हाधिकारी भंडारा यांना दि.२३/०२/१८ रोजी १.वाजता देण्यात आले.निवेदन देते वेळी अ भा तैलिक साहू महासभा युवा अप्पर महामञी सर्वश्री सुभाष जी घाटे ,देविदासजी लांजेवार अध्यक्ष भंडारा जिल्ह्य,निहालचंद पाटील कार्याध्यक्ष,जाधवराव साठवणे कोषाध्यक्ष,नितीन मलेवार उपाध्यक्ष, मंगेश वंजारी महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभा भंडारा,सौ.कूंदा वैद्य अध्यक्ष महिला महाराष्ट्र प्रांतीक भंडारा,श्रीमती शोभा बावनकर,सौ.नवखरे, दिनेश जी मस्के दक्षिण नागपूर अध्यक्ष , राकेश जी ईखार नागपूर शहर उपाध्यक्ष युवक आघाडी,श्रावण नागुलकर तसेच संताजी यूवा सेना भंडाराचे सर्वश्री अमित बिसेन। शिरीष बावनकुडे  सर्व पदाधिकारी, संताजी सेवा मंडळाचे पदाधिकारी, तेली समाजाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Teli Samaj Bhandara gives Protest Request to Collector for Dondaicha rape victim

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Osmanabad Teli Samaj gunavantha vidyarthi satkar