वधू - वर फॉर्म

बालिका अत्‍याचार प्रकरणी अहमदनगर तेली समाजाचा मूक मोर्चा 26 फेब्रुवारी

25 February 2018 Teli samaj 102 views

       अहमदनगर : धुळे जिल्ह्यातील होंडाईचा येथील बालिकेवर अत्याचार करणाच्या शिक्षकास कठोर शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी नगर शहरात सोमवार दि. २६ रोजी अहमदनगर तेली समाजाचा मूक मोर्चा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आयोजक हरिभाऊ डोळसे यांनी दिली. तेलीखुट येथून सोमवारी दीड वाजता हा मोर्चा निघणार असून या मोर्चात जिल्ह्यातून समाजबांधव सहभागी होणार आहेत. या गुन्ह्याचा तपास विशेष पथकाकडे देण्यात यावा, अतिशीघ्र न्यायालयात हा खटला पाठविण्यात यावा, विशेष सरकारी वकील उज्वल निकर्म यांची नियुक्ती करण्यात यावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे. मूकमोर्चाच्या आयोजनात प्रख्यात क्रीडापटू अंजली देवकर, दिनकर घोडके, सोमनाथ देवकर, अरविंद दासणकर, रमेश सांके, कृष्णकांत साळंके, विजय दळवी,विजय काळे, सदाशिव पवार, डॉ. सुधाकर चौधरी आदी समाजबांधव सहभागी असून समाज बांधवासह सर्वजाती-धर्मातील

       सूज्ञ नागरिकांनीही मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन सकल जिल्हा तेली समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.

Teli Samaj Ahmednagar Muk Morcha

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाजाची राजकीय ताकद - विदर्भातील तेली समाजाचे राजकीय वर्चस्व | Political Power of Teli Samaj