वधू - वर फॉर्म

राहुरी तालुका खादी ग्रामोउद्योग संघ बिनविरोध

28 March 2015 Other 147 views

     अहमदनगर - राहुरी तालुका खादी ग्रमोउद्योग संघाची २०१५ -२०२० ची संचालक मंडळाची पंचवार्षीक निवडणूक बिनविरोध झाली आहे.

     विद्यमान अध्यक्ष रमेश पन्हाळे यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल तयार करण्यात आले होते.  निवडणुक प्रक्रियेत ३० इच्छुकांनी उमेदवारी करण्यासाठी मोर्चे बांधणी केली होती. परंतु शवटच्या क्षणी आवश्यक तेवढेच अर्ज शिल्लक राहिले. निवडणुक निर्णय अधिकारी एस.व्ही. ठोंबरे यांनी बिनविरोध ची घोषणा केली. विद्यमान अध्यक्ष  रमेश पन्हाळे, अँड. तात्यासाहेब डोळसे, शिवाजीराव भाकरे, बाळासाहेब पडघलमल, शिवाजी नालकर आझमखान पठाण, जिवय वाघचौरे, गोरक्षनाथ ससाणे, दिलीप ससाणे सौ. बानो हमीद तांबोळी, सौ. पारूबाई गोपिनाथ शिंदे यांचा समावेश बिनविरोधमध्ये आहे या सर्वांचे अभिनंदन, जिल्हा तेली समाज महासभा सचिव सदाशिव पवार, कार्याध्यक्ष, सुधाकर चौधरी, राहुरी तालुका अध्यक्ष, दत्तात्रय सोनवणे राहुरी शहर अध्यक्ष संजय पन्हाळे, आसाराम शेजुळ, नामदेव शेजुळ, संदिप सोनवणे यांनी केले आहे. 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

dussehra milan samaroh and Garba Mahotsav Sahu