वधू - वर फॉर्म

उस्मानाबाद जिल्हा तेली समाजा तर्फे सत्कार

15 May 2018 Teli samaj 80 views

         उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा तेली समाजा तर्फे जत्रा फंक्शन हॉल येथे चंद्रशेखर घोडके हे यु.पी.एस.सी. परिक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा व त्यांचे वडील रामेश्वर घोडके आई शोभा घोडके यांचा प्रमुख पाहुणे जेष्ठ मार्गदर्शक कोंडप्पा कोरे यांचे हस्ते शाल, श्रीफळ व फेटा घालून सत्कार करण्यात आला. प्रारंभी जिल्हाध्यक्ष रवी कोरे आळणीकर यांनी आपल्या प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे कोंडाप्पा कोरे यांनी अभिनंदन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्ता बेगमपुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन रामेश्वर शेटे यांनी केले. कार्यक्रमास तेली समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ घोडके, श्रीकांत साखरे, प्रदिपभाऊ साळुखे, किरण एकसिंगे, बहुजन योद्धा समाजिक संघटनेचे लक्ष्मण माने, नितीन शेरखाने, लिंगायत समाजाचे अध्यक्ष शिवानंद कतले, प्रा. भागवत कापसे, महादेव मेंगले, लक्ष्मण मेंगले, सुरेश घोडके, मुन्ना सुरवसे, जितेंद्र घोडके, मधुकर घोडके, दत्तात्रय घोडके आदी समाज बांधव व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

indian Republic Day with army & Sahu samaj