वधु - वर फॉर्म

राठोड तेली युवा सेना अकोला तेली समाज एकता मेळावा व महारॅली पूर्व नियोजन बैठकी

19 May 2018 Teli samaj 36 views

        राठोड तेली युवा सेना अकोला तर्फे दिल्ली येथे आयोजित तेली समाज एकता मेळावा व महारॅली च्या पूर्व नियोजना साठी बैठकीचे आयोजन गाडगे महाराज व्यायाम शाळा अकोला येथे  करण्यात आले होते यावेळी समाजातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सत्कारमूर्ती चि. भावेश सुरेन्द्र मेहरे याला आलम्पियाड मॅथेमॅथिक्स परीक्षे मध्ये गोल्ड मेडल मिळाल्या बद्दल राठोड तेली युवा सेना अकोला तर्फे ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. तसेच मा.श्री सुभाषजी घाटे, मा.श्री देवाशिषजी काकड, मा.श्री रमेशजी गोतमारे, मा. प्रा.प्रशांतजी शेवतकार सर यांचा राठोड तेली युवा सेना तर्फे  सत्कार करण्यात आला या प्रसंगी मान्यवरांनी संघटनेच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सुञ संचालन श्री अनिलजी वानखडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा संघटक श्री प्रमोदजी चोपडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी राठोड तेली युवा सेना चे जिल्हा उपाध्यक्ष सुरेन्द्रजी मेहरे,जिल्हा सचिव कृष्णा थोटांगे, शहराध्यक्ष राहुलजी कुरडकार,गजानन मालगे, निळूभाऊ मालगे, किशोरजी  सोनटक्के, आशिषजी वासनकार ,अमोलजी ईचे ,दिपकजी भिरड ,राजुजी गोतमारे ,रविजी गोतमारे यांच्या सह अनेक समाज समाजबांधवांचे सहकार्य लाभले.   गाडगे महाराज व्यायाम शाळा ने जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्‍यात आले.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

PM नरेंद्र मोदी, तेली OBC समाज और UGC Bill Controversy - जाति है कि जाती ही नहीं