वधू - वर फॉर्म

पाथर्डी संताजी परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी बनसोड

28 May 2018 Teli samaj 89 views

          पाथर्डी तालुक्याच्या संताजी परिषदेच्या अध्यक्षपदी पाथर्डी येथील पार्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन संदीप बनसोड यांची निवड करण्यात आली आहे. संताजी परिषदेचे जिल्हाध्यक्ष मदन गडदे यांनी ही निवड जाहीर केली आहे. संघटनेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू व लवकरच तालुका कार्यकारिणी जाहीर करू असे तालुकाध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर बनसोड यांनी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल संताजी परिषदेचे प्रदेश संयोजक संतोष शेंदूरकर, जिल्हा सचिव राहुल साळुके, पाथर्डीचे माजी नगरसेवक बाळासाहेब सुद्रुक, महेश क्षीरसागर, बबनराव रणखांब, राजेंद्र गवळी, गोपाळ शिंदे, मच्छिंद नाना देहाडराय, कैलास अण्णा देहाङराय, पंडितराव गवळी, शरद शेंदूरकर, बबनराव शिरसागर, भाऊ शिरसागर, मनोज शिरसागर यांनी अभिनंदन केले आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Mahasamund Sahu Samaj pratibha samman samaroh