वधू - वर फॉर्म

शिवापूरच्या सरपंचपदी शारदा बारमुख

11 April 2018 Teli samaj 92 views

    हवेली तालुक्यातील शिवापूरच्या सरपंचपदी शारदा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यापुर्वीच्या सरपंचानी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे सरपंच पदासाठी निेवडणूक झाली.

    सरपंचपदाच्या या निवडणुकीत शारदा बारमुख ह्या एकमेव असल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी शेखर शिंदे यांनी जाहिर केले. ग्रामसेवक विजयकुमार तसेच तलाठी तांबोळी यांनी मदत केली. या वेळी मावळत्या सरपंच दिघे, उपसरपंच आण्णा दिघे. ग्रामपंचायत सदस्य नीता फराटे, मंगेश कुभार, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व माजी उपसरपंच पै. उमेश दिघे, लेखनिक संजय दीक्षित, राजेंद्र दिघे, मोहिते, शिंदे, मा. सदस्य तानाजी दिघे, दादा वाळंजकर, तुकाराम खळदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व ग्रामस्थानी नवनिर्वीचत सरपंचाना हार्दिक शुभेच्छा दिल्या. 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

kokanastha Teli Samaj Teli Ghana