वधु - वर फॉर्म

श्री संताजी प्रतिष्ठान कोथरूड पुणे चा वर्धापन दिन साजरा 

11 April 2018 Teli samaj 32 views

       श्री संताजी प्रतिष्ठान कोथरूडचा 24 वा वर्धापन दिन संत गंगाराम लरलर सांस्कृतिक हॉल महातोबा मंदिरा जवळ कोथरूड पूणे 38 येथे उत्साहात साजरा झाला.  यानिमित्त तिळगुळ समारंभ हळदीकुंकू विद्यार्थ्यांचा गुणगौरव मोफत आरोग्य तपासणी शिबीर होम मिनिस्टर  स्नेहभोजनाचा कार्यक्रम 26 जानेवारी 2018 रोजी उत्साहात आणि आनंदात पार पाडला. 

     या कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन प्रतिष्ठानच्या सर्व महिलांनी केली.  भाषण  बाजी  पुर्ण  पणे  टाळण्यात आली होती.  उपस्थितांचे स्वागत व सूत्रसंचालन  सौ विना किर्वे  यांनी केले तर  प्रास्ताविक सौ सुरेखा देशमानेनी केले .

       वाघोली ते सामाजिक कार्यकर्ते व सुदूंबरे उत्सवाचे अध्यक्ष श्री रोहिदास शेठ उबाळे यांच्या पत्नी सौ. नंदीनी उबाळे,  सौ. मिनाक्षीताई किर्वे , सौ.  प्रमिलाताई किर्वे,   नगरसेविका मंजुषा ताई खर्डेकर,  श्री संदीप खर्डेकर, सौ.   वासंतीताई जाधव,   विठ्ठलराव किर्वे,   पांडुरंग क्षीरसागर,  अविनाशजी किर्वे,   यांच्या हस्ते  संताजी महाराजांच्या प्रतिमेस हार घालून दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.  

     त्याचबरोबर सर्व मान्यवरांचे व प्रमुख पाहुण्यांची सत्कार सौ. वैशली किर्वे, सौ. शैला भोज, सौ. कल्पना चौधरी, सौ. लक्ष़्मी क्षिरसागर, सौ. विणा किेर्व, सौ. मिनाक्षी, करपे, सौ. सुरेख देशमाने, सौ. वौशली शेलार, सौ. निलम घाटकर,  सौ. सुचिता हाडके, सौ. सुनिता भोज, सौ. सुनंदा किर्वे, सौ. ज्योती  किर्वे, सौ. रंजना उबाळे, सौ. उमा किरवे, सौ. प्रिया देश्माने, सौ. प्रियंका किर्वे, सौ. मंगला गुलवाडे, सौ. कल्पना उबाळे, सौ. शितल वुजाडे, सौ. ज्योती कर्पे, सौ. दिपा कर्पे, सौ. सविता चौधरी, सौ. रामेश्वरी क्षीरसागर, सौ. श्रद्धा धामणे, सौ. जयश्री भोज, सौ. सुरेखा  दळवी,  सौ. सुरेखा  शिंदे, सौ. अरूणा भोज,  सौ. मनिषा जगनाडे, सौ. जनाबाई कटके, सौ. मयुरी भोज, सौ. दिपा क्षिरसागर, सौ. गायत्री सोनवण्े, सौ. नयना क्षीरसागर, सौ.  वृषाली गुलवाडे,  सौ. दिपीका  गुलवाडे या महिलांनी केले.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

संत संताजी जगनाडे महाराज संक्षिप्त परिचय | Sant Santaji Jagnade Maharaj Jivanpat