Bride / Groom Form

सबका साथ, सुदुंबरे का विकास

11 April 2018 sant santaji maharaj jagnade 94 views

विचार मंथनातून समोर आलेले सत्य श्री. संतश्रेष्ठ संताजी महाराज जगनाडे, तेली संस्‍था सुदुंबरे ट्रस्ट, नवीन कार्यकारणी (2017/2021) साठी तयार झाली त्याबद्दल सर्व समाजबधवांना मनापासुन खुप आनंद झाला. तसेच सर्व नवीन कार्यकर्णीस मनापासून हार्दिक शुभेच्छा ! सर्वांचे मनस्वी अभिनंदन ! 

    त्याच बरोबर नवनिर्वाचित कार्यकारणी सदस्य देखील खुप उत्साही झाले त्यामुळे हे सर्व पाहून मनाला खुप बरे वाटले.

  तसेच समाज्यातील समाजबधवांच्या नवनिर्वाचित कार्यकारणी कडून खुप आश्या अपेक्षा वाढल्या आहे,आणि साहजिक त्या असणे स्वाभाविकच आहे. 

    पण,हे करत असताना कार्यकारणीवर काम करण्याची इच्छा भरपूर जणांनी प्रकट केली तसे त्यांनी स्वतःहून आपले नावे दिली हे बघून खुप बरे वाटले.हे सर्व करत असताना काही गोष्टी घटनेच्या नेमावलीत बसून करायला लागतात कारण आपल्या जुन्या घटने प्रमाणे 14 सदस्यांचीच कार्यकारणी बनू शकते, आणि काम करणारी संख्या झालीय जास्त,मग नावे कमी कुणाची आणि कुणी करायची हा समोर आला प्रश्न, आता सर्वजण बोलतील कि त्याला काय होते कार्यकारणी जास्त झालीतर ,त्याबद्दल कुणाचे दुमत नाही. तसे घटनेत बदल हि होऊ शकतील.पण,जेव्हा सामाजिक काम करत असताना आपण समाज्यामध्ये जातो तेव्हा कटाक्षाने एक प्रश्न सर्वजण विचारतात कि जर या समाज उसाई कार्यकर्त्यांनी किती योगदान दिले आहे. जर हेच देऊ शकत नाही, तर हे लोकांकडे काय मागणार आणि आम्ही काय म्हणून यांच्याकडे योगदान देणार.तेव्हा आपणास नवीन कार्यकरणीवर काम करायचे आहे आणि समाज्यापुढे सुदुंबरे विकास आरखड्याचा प्रस्ताव घेऊन जायचे असेल तर नवनिर्वाचित कार्यकारिणीने आपले स्वतःचे प्रत्येकी एक भरगच्च आर्थक योगदान असायला हावे. म्हणजेच सुरवात स्वतःपासूनच केलीतर लोकही स्वतःहून चांगले योगदान देतील त्यात शंका नाही.

     उदा. आज मितीला 40 सदस्य आहेत तर प्रत्येकी 100000/- रुपये 40 सदस्य तर = 40,00,000/-  होतील. मग झालीकी वॉलकम्पाउडला सुरवात. तर चला आपण स्वतःहून सुरवात करा आणि समाज्यासमोर एक चांगला आदर्श निर्माण करा.
। । जय संताजी । ।
( यातून कुणाची मने दुखवण्याचा हेतू नाही.)

sant santaji jagnade maharaj

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

अखिल भारतीय तैलिक साहू महासभा राष्‍ट्रीय कार्यकारणी बैठक मै श्री विजय चौधरी प्रदेशाध्‍यक्ष भजपा