वधु - वर फॉर्म

वीरशैव लिंगायत तेली समाज राज्य स्तरीय वधू-वर परिचय मेळावा सोलापुर बार्शी

19 May 2018 teli samaj vadhu var melava 86 views

          सोलापुर बार्शी - वीरशैव लिंगायत तेली समाज संस्थेच्यावतीने २० मे रोजी ११ वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह येथे राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ कचरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच तुळजापूर रस्ता येथे नव्याने बांधण्यात आलेल्या समाज भवनाचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमासाठी शिवाचार्य दहिवडकर महाराज, परंडकर महाराज, मानूरकर महाराज, आँघकर महाराज, माढकर महाराज आदी संतांबरोबरच बार्शीचे आमदार दिलीप सापल, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, नपा. विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

       तेली समाज हा अल्प समाज असला तरीही केवळ समाजातील एकजूट आणि एकमतमुळे आजपर्यंत सामुदायिक विवाह सोहळा, वधूवर परिचय मेळावा आदी उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. तर लोकसहभागातून लाखो रुपये देणगी आणि वर्गणीतून नव्याने समाज भवन बांधण्यात आले आहे.

         कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजाभाऊ कचरे, माजी नगरसेवक नागजी नानजकर, भीमराव कोरे, अशोक नानजकर, किशोर दळवे, सोमनाथ देशमाने, बाळासाहेब गाताडे, भगवान क्षीरसागर, दत्तात्रय देशमाने आदी परिश्रम घेत आहेत. वधू-वर साठी संपर्क ९४२२६४८१९४ आणि ९०११६६२९५० या माबाईलवर संपर्क साधावा. तरी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Wardha teli Samaj gunvant vidyarthi satkar