वधु - वर फॉर्म

तेली समाज ठाणे महानगर शैक्षणिक यशाची गुरुकिल्ली कार्यक्रम

01 July 2018 Teli samaj 20 views

       ठाणे महानगर तेली समाजातील इयत्ता 8 वी ते 12 वी तसेच पदवीधर  विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना आवाहन करण्यात आले आहे  की, शनिवार, दिनांक 30 जून 2018 रोजी सायंकाळी ठीक 5 वा. "शैक्षणिक यशाची गुरुकिल्ली" हा कार्यक्रम खास  तेली समाजा साठी ठाणे शहरातील सरकारी  अधिकारी  वर्ग यांच्या सहकार्याने  आयोजित करण्‍यात आलेला  आहे.  सदर  कार्यक्रमाचे आयोजक  - श्री संताजी महाराज सेवा प्रतिष्ठान, ठाणे (नोंदणीकृत) ,  श्री संताजी भगिनी मंच ठाणे,  श्री संताजी युवा प्रतिष्ठान, ठाणे स्थळ :- आर्य क्रीडा मंडळ हॉल, गावदेवी मैदान, ठाणे (पश्चिम).  कार्यक्रमाचे  मार्गदर्शक:-  श्री.अरूण नाईक (समुपदेशक) या अनुभवी वक्त्यांचे व्याख्यान व  श्री. प्रतिक खामतकर (भारतीय प्रशासकीय सेवेत निवड-2018) यांच्या मौलिक मार्गदर्शनाचा लाभ उपस्थितांना मिळणार आहे.  त्या वेळी समाजातील प्रतिभा संपन्न व्यक्तींचा सत्कार देखील करण्यात  येणार आहे. 

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

indian Republic Day with army & Sahu samaj