वधु - वर फॉर्म

तेली समाज कार्यात सौ. निता करपे यांचा सहभाग

26 April 2015 Teli Samaj Pune 46 views

    पुण्याचे जुने जाणते बांधव कै. बाबुराव करपे यांच्या सुन सौ. निता करपे. या संगमनेर जि. नगर येथील श्री. सुरेश बाबुराव रहातेकर यांच्या कन्या श्री. रहातेकर संगमनेर नगर पालीकेचे १५ वर्ष नगर सेवक होते. निता यांना समाज सेवेचे बाळकडु लहानपणीच मिळाले. कै. बाबुराव करपे घराण्यात आल्या. येथेही त्या सममाज कार्यात मग्न झाल्या. कै. बाबुराव करपे हे एक जाणते व प्रतिष्ठीत बांधव होते. त्यांच्या कडे समाजाची तळमळ होती. एक दिशा होती त्यामुळे सौ. निशा पुणेकर झाल्या  तिळवण तेली समाजाच्या कार्यालया पासुन जवळच घर असल्यामुळे त्या वेळ काढून समाज कार्यात सहभागी होऊ लागल्या विद्यमान विश्वस्त व जेष्ठ समाजबांधव यांच्या सहकार्याने कार्यरथ झाल्या. विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली महिला संघटन करू लागल्या महिलांचे प्रश्न सामुदाईक पणे एकत्र आल्या शिवाय सुटू शकणार नाहीत यासाठी सर्वांना बरोबर घेऊन अडचनीला अर्थिक मदत होऊ लागली. विचाराची देवाण घेवाण होऊ लागली आरोग्य शिबीर पाककृतीचे रेसीपीज, नवरात्र उत्सव महिलांचा भोंडला, दांडीया असे नियोजन करण्यात सर्वात पुढे रहाततात. या वर्षींतर सर्व महिलांनी गुडी पाडव्यास महिलंाची गुडी समाज कार्यात उभी केली.
    तिळवण तेली समाजाच्या वेगवेगळ्या सामाजीक उपक्रमात सहभाग १) राज्यस्तरीय वधुवर मेळावा, २) २६ जानेवारी प्रजास्त्ताक दिनी हळदी कुंकू व प्रश्न मुंजषा कार्यक्रमाचे नियोजन ३) १५ ऑगष्ट रोजी होणार्‍या गुणगौरव समारंभात सहभाग ४) संताजी महाराज  पालखी सोहळा पुणे मुक्कामी असताना सक्रीय सहभाग. तिळवण तेली समाज माध्यमातुन सातत्याने होणार्‍या उपक्रमात सक्रीय सहभाग.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

हेमू तेली विक्रमादित्य आखिरी हिंदु राजा - Last Hindu King Hemu Vikramaditya (Teli)| Mughals vs Hemu