वधू - वर फॉर्म

उस्मानाबाद तेली समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

23 July 2018 Teli samaj 99 views

          उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाच्या वतीने समाजमेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा मा.आमदार जयदत्त आण्णा क्षिरसागर व मा.खासदार रामदासजी तडस यांच्या हस्ते. उस्मानाबाद शहरातील समर्थ मंगल कार्यालय येथे दिनांक वार रविवारी २९/०७/२०१८ रोजी सकाळी ११:३० वाजता समाज मेळावा व १० वी १२ वी च्या गुणवंताचा व यु पी एस सी ,एम पी एस सी परिक्षेत उतीर्ण  झाल्याबद्दल त्यांचा गुणगौरव मा.आमदार माजी मंञी तथा अखिल भारतीय तैलिक शाहू महासभा राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त आण्णा क्षिरसागर व मा.खासदार तथा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अध्यक्ष रामदासजी तडस (वर्धा) तसेच महाराष्ट्र राज्य ओबीसी आयोगाचे संचालक तथा  महाराष्ट्र राज्य प्रांतिक तैलिक महासभेचे महासचिव मा.श्री भुषणजी कर्डीले या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व समाज बांधवांनी आपल्या कुटुंबासह उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी हि विनंती करण्‍‍‍या. आलेली आहे. 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Amravati Teli Samaj Gunvant Vidyarthi Satkar