वधू - वर फॉर्म

खान्देश तेली समाज सेवा संस्था जळगाव तर्फे गुणगौरव सोहळा

09 July 2018 Teli samaj 109 views

              खान्देश तेली समाज सेवा संस्था तर्फे गुणगौरव सोहळा खान्देश तेली समाज सेवा संस्था, जळगाव तर्फे आयोजित खान्देशस्तरीय  10 वी व 12वी / स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण / क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी केलेल्या गुणवंत  विद्यार्थ्यांचा गुणगौरव व माध्यमिक, उच्चमाध्यमिक शिक्षक तसेच प्राध्यापकांचा सत्कार सोहळा 2018 दि. २९ जुलै रविवार रोजी सकाळी १०.०० वाजता सरदार वल्लभभाई पटेल सभागृह (लेवा भवन) येथे आयोजित करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी गुणपत्रकाचे झेरॉक्स व त्यामागे नांव, पत्ता व संपर्क नोंदवून आयोजकांपर्यंत पोहचवावा. शिक्षक व प्राध्यपकांनी आपली व कार्यरत असलेल्या संस्थेसंबधी संपूर्ण माहिती फोटोसह  आयोजकांपर्यंत पोहचवावी. पत्ता : १) व्ही.आर.पाटील ज्वेलर्स, भवानी माता मंदिर समोर, सराफ बाज़ार, जळगांव, मो.: ९२७७७७१००० २) शॉप नं.३, हिरापन्ना अपार्टमेंट,  सिव्हील हॉस्पिटल शेजारी, जळगाव  मो.: ९४२३४८७५८६ सदर माहिती प्रत्यक्ष, ई-मेल अथवा व्हॉटसअप द्वारे २०  जुलै च्या आत द्यावी हि विनंती

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Shri sant Santaji Jagnade Maharaj Jayanti Deori, Gondia