वधू - वर फॉर्म

उस्मानाबाद तेली समाजाची बैठक

23 March 2018 Teli samaj 97 views

                उस्मानाबाद दि. 23-03-2018  उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाची २४ रोजी शासकीय विश्रामगृह येथे दुपारी २ वाजता जिल्ह्यातील सर्व तेली समाज बांधवाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ घोडके जिल्हा सचिव अॅड. विशाल साखरे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत वाशी, ईट, भूम तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे. व विविध विषयावर या बैठकीत चर्चा करुन पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत. तसेच समाज बांधवाच्या विविध कार्याचे कौतुक सोहळा व त्यांचा सत्कार जिल्हा कार्यकारिणीच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

संत संताजी जगनाडे महाराज संक्षिप्त परिचय | Sant Santaji Jagnade Maharaj Jivanpat