वधू - वर फॉर्म

नेवासा तेली समाज शहराध्यक्षपदी बंडू जाधव

24 September 2018 Teli samaj 103 views

         प्रांतिक तैलिक महासंघ तेली समाजाच्या नेवासा शहराध्यक्षपदी बंडू जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांना जिल्हाध्यक्ष भागवन लुटे यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. | प्रगतिशील शेतकरी पुरुषोत्तम सर्जे यांना सार्थ गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल याप्रसंगी त्यांना सन्मानित करण्यात आले. या बैठकीला युवा जिल्हाध्यक्ष विलास वालझाडे, जिल्हा सचिव रवींद्र करपे, नंदू लुटे, रुपेश वालझाडे, प्रशांत लुटे, युवराज सोनवणे, सुरेश शेजवळ, रवी जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तत्कालीन अध्यक्ष विशाल पवार यांची जिल्हायुवा कार्याध्यक्ष म्हणून निवड झाल्याने त्यांचाही समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला. | या तालुकास्तरीय बैठकीला तालुका अध्यक्ष देविदास साळुके, रमेश सुद्रीक, भीमराज महाले, पत्रकार विजय खंडागळे, योगेश मिसाळ, काशीनाथ करपे, ज्ञानेश्वर जाधव, जितेंद्र जाधव, गणेश जाधव, सुभाष सुरसे, दिलीप जाधव, अशोक जाधव, धनंजय दहितुले, विजय लोखंडे, राजेंद्र जाधव, कैलास धारकर उपस्थित होते. स्वागत विशाल पवार यांनी तर आभार विजय . खंडागळे यांनी मानले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Shri Sant Santaji Maharaj jagnade Punyathii amravati teli samaj