वधू - वर फॉर्म

तेली समाज वर्धा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा

31 July 2018 Other 215 views

           महाराष्ट्र प्रांतिक तैलिक  महासभा, कारंजा जि. वर्धा ( तेली समाज ) चे वतीने "गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा" कार्यक्रम दि. 28/7/2018 ला स्थानिक अलिष्का सभागृहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. मोरेश्वरराव भांगे तर प्रमुख पाहुणे मा. खासदार श्री. रामदासजी तडस, जिल्हाध्यक्ष श्री. अतुलभाऊ वांदिले, सौ. सोनालीताई कलोडे, जि.प. सभापती श्री. प्रशांतभाऊ सव्वालाखे, नगराध्यक्ष, आर्वी श्रिमती रंजनाताई टिपले, उपसभापती पं.स. सौ. पुष्पाताई चरडे, सदस्या, पं.स. श्री. देवाभाऊ निखाडे, उपाध्यक्ष वर्धा जिल्हा व ईतर मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी 60 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. डाॅ. मनिष वंजारी व डाॅ. सौ. मृणालिनी टुले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष राजेश काळबांडे यांनी तर उपस्थितांचे आभार दिलीप जसुतकर व संचालन सौ. ठोंबरे मॅडम यांनी केले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Aali Bhakta Shrestha Shri Sant Santaji maharaj jagnade Marg Naamkaran