वधू - वर फॉर्म

तेली समाजातिल रोहिदास उबाळे आदर्श समाजरत्न 

04 June 2018 Teli samaj 76 views

    तेली समाजातील आदर्श समाजरत्न रोहीदास चंद्रकांत उबाळे वाघोली, पुणे या शहर तिळवण तेली समाजातील आधुनिक विचारसरणी असलेले दानशुर युवा नेतृत्व, केवळ समाजातीलच नव्हे, तर जात-पात, धर्म असा भेदभाव नकरता गरजुंच्या मदतीसाठी स्वतः होऊन धावणारा कार्यकर्ता आशी ओळख असणारे हे थोर व्यक्तिमत्व आपल्याकडे जे आहे. ते परमेश्वराच्या कृपेन आहे. त्याचा इतरांना देखील उपयोग  झाला पाहिजे अशी कायम तळमळ असणार्‍या उबाळे परिवाराच्या पंरपरेला साजेसे असे माहान समाजकार्य रोहीदासशेठ स्वतः आणि त्याचा परिवार मागील 15  वर्षापासून करीत आहे. समाजातील किंवा परिसरातील वधु-वर पालक परिचय मेळावे असोत. त्या माध्यमातून जमनार सामुदायिक विवाह असोत, गरीब गरजसाठी वैद्यकीय मदत असो, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत असो, या कार्यात रोहीदासशेठ उबाळे व त्यांच्या परिवार मागील अनेक वर्षापासून सक्रिय कार्यरत आहे. यामुळेच सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात पुणे शहरातील वाघोली येथे वास्तव्यास असलेला उबाळे परिवार नेहमिच सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli samaj Beed gunvant vidyarthi satkar by Jaydutt Kshirsagar