वधु - वर फॉर्म

तेली समाजाचे युवा शक्ती वैभव सतीश वैरागी

04 June 2018 Teli samaj 81 views

    आबलोली : गेली 75 वर्षे तेली युवक संघाच्या माध्यमातून गुहागर शहरात समाज संघटनेचे चाललेले कार्य कौतुकास्पद असून, हीच संघटीत युवा शक्ती समाजाचे वैभव आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे कोकण विभागीय अध्यक्ष सतीश वैरागी यांनी काढले.  गुहागर शहरातील तेली युवक संघ, गुहागर - मुंबई यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. समाज संघटनेसाठी मनाने एकत्र येऊन आगामी राजकारणात निर्णायक भूमिका बजवावी, असे मार्गदर्शन जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी केले.

    श्री संताजी जगनाडे महाराजांना अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आपल्या प्रास्ताविकात सुरेश राऊत यांनी आगामी उपक्रमांची माहिती दिली. यावेळी प्रभाकर रहाटे, विजय रहाटे, राजस कदम यांनी विचार मांडले. 

    यावेळी व्यासपीठावर युवक संघाचे अध्यक्ष अरूण रहाटे, जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार, कोकण विभाग अध्यक्ष सतीश वैरागी, अ‍ॅड. नानासाहेब पवार, कार्याध्यक्ष दीपक राऊत, कल्पना लांजेकर, श्रीमती वैरागी, संतोष जैतापकर, एकनाथ रहाटे, कविता रहाटे, शिवराम रहाटे, जयवंत रसाळ, शशिकांत पवार, गणेश महाडिक, गणेश धोत्रे उपस्थित होते.

    कार्यक्रमासाठी युवक संघाचे अरुण रहाटे, अनिल राऊत, सुहास रहाटे, प्रवीण रहाटे, संदीप रहाटे, महेश रहाटे, संदीप रहाटे, महेश रहाटे, संदीप रहाटे, गणेश रहाटे, राजेश पवार यांच्यासह सर्व पदाधिकारी, महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन चंद्रकांत झगडे यांनी केले. संदीप रहाटे यांनी आभार मानले.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Teli ekta rally delhi