Bride / Groom Form

मराठा आरक्षणाला सहकार्य करणार्‍या तेली संघटनांनी मराठा संघटनांत जावे ?

04 June 2018 Teli samaj 88 views

मराठा आरक्षणाला सहकार्य करणार्‍या तेली संघटनांनी मराठा संघटनांत जावे ?  भाग 1

    मराठा समाजाने आरक्षणासाठी संसदे समोर आंदोलन केले त्या वेळी मा. प्रदिप ढोबळे अध्यक्ष ओबीसी सेवा संघाने आपली भुमीका स्पष्ट केली मराठा समाजाला संविधानाच्या चौकटीत आरक्षण द्या. ते ओबीसी प्रर्वगात असूच शकत नाहीत. त्यांना त्यांचे वेगळे आरक्षण दिले तर आमचा विरोध नसेल तर उलट आम्ही त्यांना सहकार्य ही करू. दाम व मनगटशाहीने जर आरक्षण मिळवू पहाल तर 52 टक्के ओबीसी रस्त्यावर उतरेल. शासनकर्त्याना राज्य करणे अवघड होईल. मुळात आरक्षणासाठी केंद्र शासनाने नचिअप्पन यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला होता. शासनाने जणगणना करून ज्या त्या जातीच्या लोकसंख्ये नुसार त्यांना आरक्षण द्या. परंतू काँग्रेसने व भाजपाने हा अहवाल दडपून ठेवला आहे. तो मंजूर करावा यासाठी ओबीसी सेवा संघ इतर ओबीसी संघटनांना सोबत घेऊन 11 एप्रिल 2018 ते 11 मे 2018 या महिनाभर ओबीसी जणगनणा अभियान रथ यात्रे द्वारे आयोजित केले.
 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाजाची राजकीय ताकद - विदर्भातील तेली समाजाचे राजकीय वर्चस्व | Political Power of Teli Samaj