वधू - वर फॉर्म

तेली समाजाचे जेष्ठ नेते माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांताराम पोटदुखे याचे वृद्धापकाळानं निधन

23 September 2018 Teli samaj 199 views

            चंद्रपूर : तेली समाजाचे जेष्ठ नेते माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांताराम पोटदुखे याचे वृद्धापकाळानं निधन. ते 86 वर्षांचे होते. मागील 10 दिवसांपासून त्यांच्यावर नागपूरच्या अरनेजा हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. पी व्ही नर्सिम्हा राव यांच्या मंत्रिमंडळात ते तत्कालीन अर्थमंत्रीे मनमोहन सिंग यांचे सहकारी होते. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून ते सलग चारदा निवडून आले. अजातशत्रू म्हणून त्यांची ओळख होती. साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील शैक्षणिक विकासात त्यांचं भरीव योगदान राहिलं. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या चंद्रपुरात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

teli Samaj congress leader Shantaram Potdukhe passes away

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

kokanastha Teli Samaj Teli Ghana