वधु - वर फॉर्म

मराठा तेली समाज अमरावती  उपवर-वधु परिचय मेळावा

24 November 2018 teli samaj vadhu var melava 5 views

        मराठा तेली समाज विकास मंडळ, अमरावती यांचे विद्यमाने आयोजित मराठा तेली समाज उपवर-वधु परिचय मेळावा । 'बंध नात्यांचे २०१९' या परिचय विशेषकाचे प्रकाशन रविवार दि. १७ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी १० वा. मेळाव्याचे ठिकाण : जयभारत मंगलम्, बडनेरा रोड, अमरावती.

      मराठा तेली समाज विकास मंडळ अमरावती यांचे द्वारे संपुर्ण महाराष्ट्रातील मराठा तेली समाजातील उपवर - वधु व पालक परिचय मेळावा रविवार दि. १७ फेबुवारी २0१९ रोजी सकाळी १0 वा. जय भारत मंगल बडनेरा रोड, अमरावती येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्यात समाजातील जास्तीत जास्त उपवर-वधूंनी व त्यांच्या पालकांनी उपस्थित राहून या संधीचा अवश्य लाभ घ्यावा. या प्रसंगी संस्थेतर्फे विवाहयोग्य उपवर- वधु परिचय पत्र असलेला संपुर्ण रंगीत ' बंध नात्यांचे २०१९ विशेषांक प्रकाशित करण्यात येईल त्याकरिता ज्या इच्छुक पालकांना आपल्या उपवर मुला-मुलींची माहिती (Biodata) या विशेषकात प्रकाशित करावयाची असेल त्यांनी आपल्या पाल्याची संपुर्ण माहिती पोस्टकार्ड व पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटोसह व नोंदणी शुल्क २०० रु. संस्थेचे छापील नोंदणी अर्जामध्ये भरुन कार्यालय मराठा तेली समाज विकास मंडळ, जय भारत मंगलम बडनेरा रोड, अमरावती येथे ३१ डिसेंबर २0१८ पुर्वी पोहचतील अशा रीतीने पाठवावी किंवा अधिक माहिती करिता आपल्या शहरातील, गावातील खाली दिलेल्या व्यक्तींशी संपर्क साधावा. या मेळाव्यास ज्या समाज बांधवांना मदत करावयाची असेल त्यांनी देणगीद्वारे किंवा प्रकाशीत होणा-या विशेषकात जाहीराती पाठवून कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य करावे ही विनंती करण्‍यात आलेली आहे..

maratha teli Samaj vadhu var melava 2019

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

lalu prasad yadav in Teli Samaj maha rally 26 February 1994