Bride / Groom Form

तेली समाज सेवाभावी संघ धाराशिव तालुकाध्यक्षपदी दत्तात्रय बेगमपुरे

24 November 2018 Teli samaj 90 views

तेली समाज सेवाभावी संघ धाराशिव तालुकाध्यक्षपदी दत्तात्रय बेगमपुरे

जिल्हा प्रतिनिधी धाराशिव, दि. २२ सप्टेंबर धाराशिव तेली समाजाच्या धाराशिव तालुकाध्यक्षपदी दत्तात्रय चंद्रकांत बेगमपुरे व उपाध्यक्षपदी महेश रामेश्वर करंडे यांची निवड करण्यात आली. ही निवड तेली समाज सेवाभावी संघाच्या बैठकीत दि. २२ रोजी करण्यात आली.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि. प. सदस्य कोंडाप्पा कोर, जिल्हाध्यक्ष रवी कोरे, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ घोडके, सचिव अॅड. विशाल साखरे, कोषाध्यक्ष महादेव मेंगले, संचालक लक्ष्मण निर्मळे, रमेश साखरे, सुर्यकांत चौधरी, सिद्धलिंग राऊत आदि उपस्थित होते. बैठकीत तालुका उपाध्यक्षपदी राऊत अमरनाथ, सचिवपदी कोरे रामलिंग, सहसचिवपदी देशमाने दिगंबर, कार्याध्यक्षपदी मेंगले सतीश, प्रसिद्धी प्रमुखपदी जटाळे महेश, संघटकपदी राऊत परमेश्वर, सहसंघटकपदी कापसे धनंजय, कोषाध्यक्षपदी भागवत हरीबा बोरके, मार्गदर्शकपदी साखरे तानाजी यांची निवड करण्यात आली.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli samaj Matrimony, matrimonial form submit in Marathi