वधु - वर फॉर्म

उस्मानाबाद जिल्हा तेली समाज श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी

02 January 2019 sant santaji maharaj jagnade 47 views

                उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाच्या वतीने सलग १० व्या वर्षी उस्मानाबद शहरातील ह.भ.प.मुकुंद महाराज कोरे यांच्या निवासस्थानी वैष्णव नगर वरूडा रोड येथे सकाळी १० ते १२ हरिकिर्तन होईल. या किर्तनास गुरूवर्य महादेव महाराज तांबे,व संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी यांच्या उपस्थितीत. ह.भ.प. भागवत महाराज कबीर- संत कबीर महाराज फड व मठ, पंढरपूर यांचे किर्तन होईल. व यानंतर गुलाल उधळुन श्री संत संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पुजन माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटिल,उस्मानाबद नगरीचे नगराध्यक्ष नंदू राजेनिंबाळकर,उपनगराध्यक्ष सुरज साळुंके,जेष्ठ नेते मा.जि.प. सदस्य कोंडाप्पा कोरे,भा.ज.पा.जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, भा.ज.पा.प्रदेश सदस्य नितिन काळे,शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास पाटिल, विरशैव लिंगायत संघर्ष समितीचे प्रदेशउपाध्यक्ष राजाभाऊ मुंडे,महात्मा बश्वेश्वर पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन श्रीकांत आप्पा साखरे,बहुजन योध्दा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय नाना शिंगाडे,कॉग्रेस पार्टिचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे,लिंगायत समाजाचे जिल्हाअध्यक्ष शिवानंद कथले,आदिंच्या उपस्थितीत पुजन करण्यात येईल यानंतर शासनाने सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्याचा राजपञ काढल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव घेण्यात येईल,व १२ ते ४ वाजेप्रयंत मोफत आरोग्य तपासणी शिबीर उस्मानाबाद जिल्हा तेली समाज सेवाभावी संघ व सह्याद्री मल्टिपेशालिटी हॉस्पीट उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉ दिग्गज दापके, डॉ संतोष होनखांबे, डॉ नागेश होनखांबे, व इतर स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या टिमसोबत सर्व समाजबांधवांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यानंतर सर्व समाजबांधवांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सर्व कार्यक्रमास उस्मानाबाद, तुळजापुर, उमरगा, लोहारा, कळंब, वाशी, ईट या तालुक्यातील व परिसरातील सर्व तेली समाज बांधव व पदाधिकारी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर उपजिल्हाअध्यक्ष राजाभाऊ घोडके, जिल्हासचिव मा.नगरसेवक अँड विशाल साखरे व सर्व संचालक मंडळाकडुन करण्यात आले आहे.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Shri sant Santaji Jagnade Maharaj Jayanti Deori, Gondia