वधु - वर फॉर्म

जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक महादेव बांदेकर यांचे निधन.

06 May 2015 Teli samaj 94 views

swatantra sainik Mahadev bandekar

    बांदा :-  वार्ताहर,  भारतीय स्वातंत्र्य लढ्यात  प्रत्यक्ष सहभाग असलेले बांदा उभाबाजार येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक महादेव लक्ष्मण बांदेकर (९५) यांचे रविवार सायंकाळी निधन झाले.
     १९४२ सालच्या स्वातंत्र्य लढ्यात महादेव बांदेकर सहभागी झाले होते. या वेळी त्यांना सात महिने करावासही झाला होता. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच पालकमंत्री ना. दिपक केसरकर यांनी बांदेकर यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली वाहुन कुटूंबीयांचे सांत्वन केले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने तहसीलदार कदम, तलाठी नलावडे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
    सोमवारी महादेव बांदेकर यांच्यावर येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुलगेू, सुना नातवंडे असा परिवार आहे. यावेळी बांदा सरपंच मंदार कल्याणकर, बांदा व्यपारी संघ सचिव सचिन नाटेकर आदींनी कुटुंबीयांचीभेट घेत सांत्वन केले. तसेच पोलिस निरिक्षक जयप्रकाश गुंठे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Aali Bhakta Shrestha Shri Sant Santaji maharaj jagnade Marg Naamkaran