वधु - वर फॉर्म

तेली समाज संघटन चंद्रपूर संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे जयंती महोत्सव व समाज प्रबोधन  कार्यक्रम

01 December 2018 sant santaji maharaj jagnade 11 views

                तेली समाज संघटन केराेडा  जिल्हा चंद्रपूर आयोजित संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे जयंती महोत्सव व समाज प्रबोधन  कार्यक्रम निमित्त श्री संत संताजी महाराज जयंती कार्यक्रम महोत्सव व भव्य पालखी मिरवणूक व फेरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम दिनांक 8-12-2018 रोजी शनिवार दुपारी एक वाजता कार्यक्रमाचे स्थळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केराेडा चंद्रपूर येथे संपन्न होईल. कार्यक्रमाचे उद्घाटक श्री प्रकाशजी देवतळे जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा चंद्रपूर, सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रामदासजी आंबटकर विधान परिषद सदस्य मुंबई,  प्रमुख पाहुणे योगिताताई प्रमोद जी पिंपरे, नगराध्यक्ष नगर परिषद गडचिरोली, रमेश भाऊ बोरसे नगरसेवक गडचिरोली, प्रभाकर जी वासेकर गडचिरोली, बाबुरावजी कोहळे गडचिरोली, भालचंद्र बोधलकर माननीय जि प सदस्य चंद्रपुर,  तुळशीदास जी कुनघाडकर, वैशाली मनोहर कुकडे, माननीय जि प सदस्य चंद्रपुर, अनंत मनोहर चिटूनवार, सदस्य ग्रामपंचायत केरोडा, गणपतराव कोठारे, जि प सदस्य सावली, केशवजी भरडकर सरपंच ग्रामपंचायत व्‍याहाड खुर्द, ईश्वरजी गंडाटे, सावली तालुका अध्यक्ष तेली समाज, भाऊरावजी कोठारे, तालुका सचिव तेली समाज, तरी सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती तेली समाज संघटन केराेडा जिल्हा चंद्रपूर तर्फे करण्यात आलेली आहे.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाजाच्या वतीने धुळे जिल्हयातील दोंडाई येथील घटनेचा निषेध