वधु - वर फॉर्म

संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा मंडळ सुदुंबरे

11 July 2015 sant santaji maharaj jagnade 36 views

श्री. ताराचंद देवराय

    पालखी निघाल्या नंतर ४/५ वर्षींनी मी पांच वारकरी घरी जेवणास बोलावत असे. नंतर ती प्रथा बंद झाली. परंतु सेवा म्हणुन ९१/९२ साली आमचा हिशोब करून देत जा आपण दिवानजी आहात  व  मार्केट मध्ये असल्यामुळे बहुतेक ट्रस्टी व्यापारी असल्या मुळे ओळख होतीच त्याचा उपयाोग व मी तिळवण तेली समाजाचा हिशोब तपासणीस व नंतर जा. सेक्रेटरी होतो. त्याचे  माध्यमातून महाराजांची सेवा करायला मिळाली अध्यक्ष माधवराव आंबीके व नंतर मेरूकर अध्यक्ष झाले नंतर सन २००० पासुन माझी सेक्रेटरी म्हणुन नेमणुक झाली. तो पर्यंत आधी बीठुमामा शिंदे नंतर लक्ष्मण आंबिके नंतर शिवाजीराव फल्ले वारीतील पेटी संभाळत होते पुढे हे काम माझेकडे आले आणि १२ वर्षा पर्यंत  आजही हिशोब तयार करण्याचे काम करित आहे. त्याच काळात पंढरपूर मठाचे काम सुरू झाल आम्हीं देणग्या जमवल्या मी मार्केट मधुन त्यावेळेस २५०००/- जमा केले तसेच स्वत: २५०००/-  रूपयांचे बांधकामास दिले व्यवहारे नाशीक बाळासाहेब अंबीके, गणेश व्हावळ प्रल्हादशेठ मिसाळ व गडगीळे जालना भगवान व्यवहारे वैजापूर असे अनेक दात्याकडुन बांधकांमासाठी हातभार लावला तसेच वर्षाीतुन ७/८ वेळेस पंढरपुर जाणे झाले. धाोंडीबा राऊत व मारधवराव आंबीके यांनी बरेच दिवस मुक्काम करून काम करून घेतले त्या वेळेस शेजारी कोण नव्हते व तेथील मंडळी फार त्रास देत होंती सर्वानी मनावर घेऊन काम केले. परत श्री. सुधाकर पन्हाळे आर्कीटेक, रत्नपारखी इंजीनियर व पोपटराव पिंगळे यांनी चांदीची पालखी  कबूल केल्यावर मेरकर साहेबांनी चांदीचा रथ दिला जाधव यांनी चांदीचा पादूका दिल्या. तसेच १०/१२ वर्षापासुन स्वस्त व चांगला माल मार्केट यार्ड मधुन घेऊन देत आहे. त्याना अनेक व्यापारी दान करतात. संस्थेचे कांही वर्षे विणा चालवला परंतु खर्च अभावी बंद करावा लागला परंतु दरमेहा अजुनही सुदूंबरे येथे चालु आहे त्याचे काम शिंदे मामा १५ वर्षापासुन पाहात आहेत. संस्थेच्या काम करित खर्च करून वैभव मिळवून दिले. त्यामध्ये कु. दत्तोबामुळे, सहादूशेठ घाटकर, दामू अप्पा, जगनाडे, विठुमामा शिंदे, धोंडीबा राऊत, दत्तोबा कहाणे, अप्पा उबाळे व त्यांचे सोबत श्री. मेरूकर , माधवराव आंबीके, राऊत बाई, कावडेबाई, व देवराय यांनी काम संभाळले आहे. परंतु नवीन मंडळींनी यांची साठवण करून चालावे.

अनुभव 

    पंढरपुर बांधकामासाठी जात असताना आमचा टेंम्पोचा बावड्या जवळ झाला त्यामध्ये श्री. मेरूकर माधव आंबीके, सुधाकर पन्हाळे, अवि मेरूकर व देवराय असे आम्ही जात होतो. डाव्या बाजुस टेम्पो  संपूर्ण फाटला मेरूकरांचे मुलास फार लागले. मागे आम्हा  सवार्ंना मुकामार लागला. त्यास हॉस्पीटलला नेते गाडी पाहुन लोक म्हणायचे किती गेले. परंतु महाराजांनी सर्वांना वाचवले सर्वांना पुण्यास पाठवले. मी मागे राहीलो कारण पोलीस कम्पलेंट करावयाची होती. सर्व उरकुन संध्याकाळी घरी आलो तो पर्यंत घरचे काळजी करून होते. ह्या टेम्पोचे ३०/४० हजारांचे नुकसान झाले ते सर्व मेरूकरांने सहन केले. 

    आताच्या कार्यकर्त्यांनी सेवा म्हणुन काटेकोर काम करावे ही शुभेच्छा. 

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj Jaipur mahila Pratigya