वधू - वर फॉर्म

मालेगांव तेली समाजाचे रमेश उचित यांची साहित्य संघाच्या अध्यक्षपदी फेर निवड

20 June 2019 Teli samaj 120 views

      मालेगांव येथील साहित्य संघाच्या अध्यक्षपदी सुप्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते मालेगांव तेली समाजाचे रमेश उचित यांची साहित्य संघाच्या अध्यक्षपदी पुढील दोन वर्षासाठी फेर निवड करण्यात आली. मालेगांव साहित्य संघाची बैठक कॅम्प सार्वजनिक वाचनालयात नुकतीच संपन्न झाली. त्यावेळी श्री उचित यांच्या निवडीचा ठराव बहुमताने संम्मत झाला.

      जेष्ठ पत्रकार भगवान बागुल यांनी श्री.उचित यांच्या अध्यक्षपदाच्या फेरनिवडीसाठी प्रस्ताव मांडला त्यास नितीन बोरसे यांनी अनुमोदन दिले. व ठराव सर्वानुमते पास झाला. यावेळी भास्कर तिवारी, नाना महाजन, रविराज सोनार, शोभा बडवे, प्रा.डोळे, शाम पाटील, शामकांत पाटील, प्रतिभा बोरसे, संजय पांडे, शिवाजी साळुके, सयाजी पगार, 150 हून अधिक साहित्यीक उपस्थित होते. विवेक पाटील यांनी सुत्रसंचालन केले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

kokanastha Teli Samaj Teli Ghana