वधू - वर फॉर्म

तेली समाज परभणी च्‍यावतीने जय संताजी युवा प्रतिष्ठाण ची स्‍थापना

27 March 2019 Teli samaj 113 views

         राष्ट्रसंत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून तेली समाजातील तरुण युवकांना एकत्रित आणण्यासाठी व त्यांचे हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी दि.१८/११/२०१८ रोजी सकाळी ११ वा. रोकडा हनुमान मंदिर, नवा मोंढा, परभणी येथे समाजातील युवकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदरील बैठकीत गुरुवर्यांच्या आशीर्वादाने थोर-मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली व तरुणांच्या सहभागाने परभणी येथे तरुणांचे जय संताजी युवा प्रतिष्ठाण हे हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे. जय संताजी युवा प्रतिष्ठानात तेली समाजातील सर्व तरुणांचा उत्स्फुर्त सहभाग असून, सर्वांना समान अधिकार प्रदान करण्यात आले आहे. तसेच दि.९ डिसेंबर २०१८ रोजी राष्ट्रसंत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती परभणी तेली समाजातील सर्व बांधवांच्यावतीने साजरी करण्यात येणार आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Shri sant Santaji Jagnade Maharaj Jayanti Deori, Gondia