वधु - वर फॉर्म

बडनेरा तेली समाज सेवा संघ विद्यार्थी सत्कार सभारंभ

25 June 2019 Teli samaj 58 views

             विदर्भ प्रदेश तेली समाज सेवा संघाची बैठक बडनेरा जुनी वस्ती तेलीपूरा शीव मंदीर येथे पार पडली बैठकी मध्ये सर्व प्रथम संताजी महाराजांचे पूजन करण्यात आले. संताजी महाराजांचे पूजन झाल्या नंतर मान्यवर वक्त्यची समाज उधबोधन पर भाषने झाली.कार्यक्रमा मध्ये दहावी व बारावी मध्ये उतीर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थीनीचां सत्कार संताजी महाराजांची प्रतिमा देऊन करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विदर्भ प्रदेश अध्यक्ष सुनिल माळोदे हे होते प्रमूख उपस्थिती मध्ये विदर्भ प्रदेश सरचिटणीस प्रमोद गोधनकर, बडनेरा शहर अध्यक्षा सौ स्वापनालीताई गायधने, अम.जिल्हा महीला आघाडी अध्यक्षा सौ प्रतिभाताई डहाके,अम.शहर अध्यक्ष्‍या सौ सविताती गोधनकर भागवत, भातकुली ता.अध्यक्ष अमोलभाऊ पडोले, श्री संताजी युवक संगटना अम. जिल्हा अध्यक्ष श्याम हिंगासपुरे, माजी सैनिक दिलीपभाऊ लोयबरे, भरतजी गायधने, सुषमाताई कारमोरे, कुंदाताई माळोदे, आदींची प्र.उपस्थिती होती याच कार्यक्रमा मध्ये बडनेरा जुनीवस्ती शाखेच्या अध्यक्ष पदी सौ वैशाली ताई भूते, उपाध्यक्षपदी विमलताई आखरे, सरचिटणीस पदी उज्वलाताई साठवने, संघटकपदी शीलाताई लेण्डे यांची बैठकी मध्ये सर्वानुमते निवड करण्यात आली.कार्यक्रमाचे सुत्र संचालन सरचिटणीस उज्वलाताई यांनी केले आभार अजय पडोले यांनी मानले.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

अभंग रक्षक श्री संत संताजी जगनाडे महाराज अभंग लेखन करताना | Sant Santaji Maharaj Writing Abhang