Bride / Groom Form

आरमोरी एरंडेल तेली समाजाची सभा उत्साहात

12 January 2017 Teli samaj 73 views

          ११ जानेवारी वडधा आरमोरी तालुक्यातील वडधा येथे काल १० जानेवारीला एरंडेल तेली समाजाची सभा उत्साहात पार पडली.

          यामध्ये ५ एप्रिलला वडधा येथे विवाह मेळावा आयोजित करण्यात आला असून वडधा तेली समाजाच्या मैदानावर सदर मेळावा आयोजित केला जाणार आहे.

          सरपंचा अर्चना कोलते यांच्या घरी पार पडलेल्या या बैठकीत ऐरंडेल तेली समाजाचे विदर्भ सचिव विठ्ठलराव ठाकरे, माजी सभापती नारायणराव कोलते, जिल्हाध्यक्ष भगवान ठाकरे, तुळशिदास करकाडे, पुंडलिक पा. लाकडे, जिवन कोलते, माजी सरपंच कवडू समर्थ, वेणुदास सहारे आदी मान्यवर उपस्थित होते.

          यावेळी मान्यवरांनी ऐरंडेल तेली समाजाच्या पुढील वाटचालीबाबत रणनिती ठरविण्यात आली असून वडधा येथे पहिल्यांदाच होणारा विवाह सोहळा व्यवस्थीत पार पडावा, यासाठी तेली समाजाने सहकार्य करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.

          यावेळी श्रावण भजभुजे, पत्रु लाकडे, ईश्वर लाकडे, तुळशिराम कोलते, देविदास कावळे, माणिक कोलते, चांगदेव कोलते व समाजबांधव उपस्थित होते.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

maa Karma Devi jayanti maha aarti Bemetara Sahu samaj