वधु - वर फॉर्म

गडचिरोली एरंडेल तेली समाजाची कार्यकारिणी गठित

17 November 2016 sant santaji maharaj jagnade 12 views

        गडचिरोली : स्थानिक पटवारी भवनात नुकत्याच पार पडलेल्या एरंडेल तेली समाजाच्या बैठकीत समाजाची जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

      समाजाच्या जिल्हाध्यक्षपदी धुडेशिवणीचे भगवानराव ठाकरे, उपाध्यक्ष कवळ समर्थ, चंद्रशेखर मुरतेली, सचिव वेणुदास सहारे, सहसचिव जगदीश्वर ठाकरे, मुख्य संघटक फकिरा भरडकर, कोषाध्यक्ष तुळशिदास करकाडे तर सदस्यपदी सुखदेव कोलते, राजू ठाकरे, युवराज करकाडे, घनश्याम लाकडे, संभाजी ठाकरे, अनिल कोलते, नामदेव कोलते, जीवनदास कोलते, क्रिष्णा भरडकर यांची निवड करण्यात आली.

      एरंडेल तेली समाज महिला कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी लता कोलते, उपाध्यक्ष ऐश्वर्या लाकडे, सुनीता सहारे, सचिव रोशनी लाकडे, सहसचिव नीलू निकुरे, कोषाध्यक्ष अर्चना कोलते, मुख्य संघटक सविता कावळे तर सदस्यपदी प्रभा भरडकर, लता मुरतेली यांची निवड करण्यात आली.

      युवा कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी लीलाधर भरडकर, उपाध्यक्ष नरेंद्र ठाकरे, मिलींद लाकडे, सचिव पुरूषोत्तम नागोसे, सदस्य दीपक करकाडे यांची निवड करण्यात आली. बैठकीला नागपूरचे विठ्ठलराव निखुले, डॉ. परसराम नागोसे, पं. स. सदस्य सविता कावळे, राजेंद्र भरडकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जगदीश ठाकरे, प्रास्ताविक भगवान ठाकरे तर आभार मिलींद लाकडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी एरंडेल तेली समाजातील युवकांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Muslim Teli Samaj Lakdi Ghana