वधू - वर फॉर्म

शासकीय कार्यालयात संत जगनाडे महाराज जयंती साजरी करण्याचे नियोजन करा : शामकांत ईशी

05 December 2019 sant santaji maharaj jagnade 94 views

       शिरपूर, शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये थोर संत, व्यक्ती यांची जयंती साजरी करण्याकरिता सामान्य प्रशासन विभागाने सुची तयार केलेली आहे. या सुचीमध्ये प्रथमच संत जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबर रोजी साजरी करण्याला तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिल्याने या वर्षीपासून संत जगनाडे महाराज यांची जयंती महाराष्ट्र शासनाच्या अधिनस्त असलेल्या सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात येणार असून या करिता प्रशासनाने व विभाग प्रमुखाने आपआपल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयाला नियोजन देण्याकरिता सुचना द्याव्या,अशा मागणीचे लेखी पत्र महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज युवक आघाडीचे अध्यक्ष सुखदेव वंजारी, प्रदेश उपाध्यक्ष शामकांत ईशी यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, निवासी आयुक्त महाराष्ट्र यांना दिले आहे.

      संत जगनाडे महाराज यांचे महान कार्य व अमूल्य योगदान लक्षात घेऊन शासकीय पध्दतीने त्यांची जयंती साजरी व्हावी म्हणून शासनाकडे तेली समाज महासभा राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर, कोषाध्यक्ष कृष्णराव हिंगणकर, राष्ट्रीय महासचिव डॉ. अरुण भरमे युवक आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय चौधरी, राष्ट्रीय प्रवक्ते विक्रांत चांदवडकर,महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज युवक आघाडी तर्फे सतत पाठपुरावा होता.

      महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागणी पुर्ण करुन २६ डिसेंबर २०१८ रोजी सामान्य प्रशासन विभामार्फत शासन परिपत्रक निर्गमीत केले. यानुसार प्रथमच डिसेंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिनस्त असलेल्या सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी होणार आहे. ही संपुर्ण महाराष्ट्राकरीता अत्यंत गौरवाची व समाधानाची बाब आहे.असे मत यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव वंजारी, प्रदेश उपाध्यक्ष शामकांत ईशी यांनी व्यक्त केले.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

झारखंड तेली समाज इतिहास और अनुसूचित जनजाति (ST) में शामिल करने की मांग – Teli Caste in Jharkhand