वधु - वर फॉर्म

पिंपरी चिंचवड शहर तेली समाज श्री संत संताजी महाराज जगनाडे जयंती

06 December 2019 sant santaji maharaj jagnade 71 views

     श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती ८ डिसेंबर २०१९ रोजी साजरी करण्यात येत आहे. यावर्षी प्रथमच राज्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयात शासन आदेशानुसार जयंती साजरी करण्यात येणार आहे. पिंपरी -चिंचवड शहरात महापालिकेच्या वतीने प्रथमच दिनांक ८/१२/२०१९ रोजी सकाळी ठिक १०.०० वा. महापालिकेच्या मुख्य कार्यालयात पिंपरी येथे तळमजल्यावर जयंती साजरी करण्याचा कार्यक्रम आयोजीत केलेला आहे.

      तसेच सुदुंबरे येथे दिवसभर जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्व समाज बांधवांना विनंती करण्यात येते की, त्यांनी रविवार, दि. ८/१२/२०१९ रोजी सकाळी १० वा. पिंपरी येथे व त्या नंतर सुदुंबरे येथे मोठ्या संख्येने हजर राहून जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे. आसे निवेदन श्री.बाळासाहेब शेलार संस्थापक श्री.दिलीप चिलेकर अध्यक्ष श्री.राजेंद्र शिंदे उपाध्यक्ष श्री.नितीन जगनाडे मुख्य सचिव श्री.पोपटराव पिंगळे कार्याध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर तेली समाजा तर्फे  करण्‍यात आलेले आहे. 

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Mahasamund Sahu Samaj pratibha samman samaroh