वधु - वर फॉर्म

राष्ट्र संत श्री संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त अहमदनगर शहरात विविध कार्यक्रम

12 December 2019 sant santaji maharaj jagnade 41 views

      राष्ट्रसंत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त नगर शहरात दोन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाने परिपत्रक काढून संताजींची जयंती उत्सव साजरा करण्याचे सूचित केले असून ही बाब समाजाच्या दृष्टीने उत्सवाचा आनंद व्दिगुणीत करणारी आहे. तरी समाजातील तिळवण तेली समाज ट्रस्ट, जिल्हा तेली समाज महासभा,श्री  संताजी सेवा मंडळ ट्रस्ट, श्री संताजी विचार मंच, श्री.संताजी महिला मंडळ, श्री.संताजी नागरी सहकारी पतसंस्था व समाजातील बांधवानी यात आपला सहभाग नोंदवावा ही विनंती करण्यात आली आहे.

     पहिला कार्यक्रम शहरातील अमरधाम-नालेगाव येथील मंदिरात असलेल्या राष्ट्र संत श्री संताजी महाराज यांच्या पुतळ्यास पुतळ्यास पुष्पहार अर्पण करणे, कार्यक्रमास मा.आ.संग्रामभैय्या जगताप, माजी खा.दिलीप गांधी, यांच्यासह ४ माननीय नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.  रविवार दि. ८ डिसेंबर २०१९  सकाळी ११.३० वा. स्थळ:- अमरधाम नालेगाव तसेच यावेळी समाज बांधवांच्या हस्ते वृक्षारोपना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

     दुसरा कार्यक्रम तेलीखुंट,संताजी चौक येथे असलेल्या संत श्री संताजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहारा अर्पण करणे कार्यक्रमास महापौर बाबासाहेब वाकळे पा. व उपमहापौर मालनताई ढोणे तसेच नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. सकाळी १२.३० वा. स्थळ:- तेलीखुंट,संताजी चौक. श्री संताजी महाराज प्रतिमा मिरवणकव मोटारसायकल रॅली राष्ट्रसंत श्री संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त मोटारसायकल रॅली काढण्यात येणार असून ही रॅली दाळमंडई येथील आपल्या विठ्ठल-रुसमीणी मंदिरापासून निघणार आहे. यात पती-पत्नी जोडीने मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून संताजींच्या स्मृतिला अभिवादन करावे व समाज संघटनेते सहभागी व्हावे. यावेळी मिठाई वाटप करण्यात येणार आहे

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli samaj Beed gunvant vidyarthi satkar by Jaydutt Kshirsagar