वधू - वर फॉर्म

तैलीक समिती तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन

18 July 2019 sant santaji maharaj jagnade 95 views

        अमरावती दि. १४ : यावर्षी संपन्न झालेल्या शैक्षणिक सत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण झालेल्यांचा गुण गौरव सोहळा अमरावती जिल्हा तैलिक समिती, भूमिपुत्र कॉलनी, काँग्रेस नगर, अमरावती तर्फे रविवार दि. २५ ऑगष्ट रोजी अभियंता भवन शेगाव नाका, व्हि.एम.व्हि. रोड, अमरावती येथे सकाळी ११ वाजता आयोजित केलेला आहे.

        सदर्ह कार्यक्रमासाठी ज्या विद्यार्थ्यांना १० वी मध्ये ८० टक्के पेक्षा जास्त, १२ वी, पदविका व पदविधर मध्ये ७५ टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त आणि स्पोर्ट करिता नॅशनल व स्टेट मध्ये प्राविण्य प्राप्त तसेच सीईटी मध्ये १२५ व नीटमध्ये ४५० गुण असणाच्या विद्यार्थ्यांनी आपली नावे गुणपत्रिकाची एक छायाप्रत, मोबाईल क्रमांक व पत्त्यासह कृपया जिल्हा तैलीक समिती कार्यालयात सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत अथवा खालील नमुद केलेल्या कार्यकत्र्यांजवळ देण्याबाबत विनंती करण्यात येत आहे. प्रा.डॉ. अनुपपंत शिरभाते ९०४९८९४७८७, प्रा. संजय आसोले ९४२०७२०४९९, अजमिरे ९८९००३०२०९, संजय रायकर ९०२१४५६४९४, रामभाऊ कावड कर ९४२३१२५२११, अविनाश पंत राजगुरे ९३२६९२५५३१ या क्रमांकावर संपर्क साधून दि. १० ऑगष्ट पर्यंत वा तत्पुर्वी प्रमाणपत्र पाठवून नोंदणी करुन घेण्यात यावी असे आवाहन जिल्हा तैलिक समितीचे सचिव इंजिनिअर मिलींद शिरभाते यांनी कळविले आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

tilvan teli samaj pune vadhu var melava