वधू - वर फॉर्म

महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडी भंडारा जिल्हा अध्यक्षपदी सुरेश गोपीचंद धुर्वे

21 July 2019 Teli samaj 116 views

          महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभेची बैठक विश्रामगृह येथे पार पडली. या बैठकीत अखिल भारतीय तैलिक साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री महाराष्ट्र राज्य ना. जयदत्त क्षीरसागर यांनी महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडी पूर्व विदर्भ भंडारा जिल्हा अध्यक्षपदी सुरेश गोपीचंद धुर्वे यांची निवड केली आहे.

         यावेळी राष्ट्रीय कोषाध्यक्ष कृष्णराव हिंगणकर, राजनैतिक प्रकोषचे अध्यक्ष सुरेश वाघमारे, माजी खासदार, विभागीय अध्यक्ष सुखदेव वंजारी, विभागीय महासचिव तिलक बालपांडे, कोषाध्यक्ष आदित्य पंधरे, भंडारा जिल्हा कोषाध्यक्ष सुखराम मलेवार तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या नियुक्तीबद्दल जिल्हा उपाध्यक्ष प्रविण बडवाईक, मोहन निर्वाण, यशवंत वंजारी, तालुका सचिव गितेश कारेमोरे, शहर अध्यक्ष गितेश राजू कारेमोरे, शुभम सावरबांधे, लंकेश गभने, मनिष क्षीरसागर, आशिष भोंगाडे, देवांशू भोंगाडे, विशाल भिवगडे व शेकडो पदाधिका-यांनी अभिनंदन केले आहे.

maharashtra prantik teli samaj mahasabha Yuvak Aghadi Bhandara district Adhyaksh Suresh Dhurve

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

झारखंड तेली समाज इतिहास और अनुसूचित जनजाति (ST) में शामिल करने की मांग – Teli Caste in Jharkhand