Bride / Groom Form

मुलाचा आधार गमाविलेल्या वृध्द माता - पित्यास बुलढाणा तेली महिला आघाडीची आर्थीक मदत

27 July 2019 Teli samaj 83 views

        बुलढाणा -  खामगाव - कुटुंबाचा मुख्य आधार असलेल्या एकुलत्या एकमुलाचे अपघाती निधन झाल्याने निराधार झालेल्या वृध्द माता - पित्यास महाराष्ट्र प्रांतीक तेली महिला आघाडी शाखा खामगाव यांच्यावतीने १९ जुलै रोजी ५ हजार ३०१ रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. अंत्रज येथील प्रल्हाद सोनटक्के यांचा एकुलता एक मुलगा संतोष सोनटक्के यांचे ६ जुलै रोजी मुंबई येथे अपघाती निधन झाले. त्यामुळे निराधार बनलेल्या वृध्द - माता पित्यास तेली महिला आघाडीच्यावतीने सदर मदत करण्यात आली. या प्रसंगी प्रांतिक तेली महासंघाच्या खामगाव शाखाध्यक्षा सौ. सुलोचनाताई सुलताने, नंदाताई सोनटक्के, प्रतिमा सोनटक्के, अंजली सोनटक्के, रुपाली वानखडे, वैशाली जामोदे, संजना जामोदे, विमल बोरे, नंदा फाटे, उर्मिला बेलोकार, शारदा गलवाडे, सरल्ला सिरसोले आदींची उपस्थिती होती.

Khamgaon teli samaj Mahila Aghadi financial help to Older parents

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

दिल्ली अखिल भारतीय तैलिक साहू युवा महासभा कार्यसमिति बैठक