वधू - वर फॉर्म

लिंगायत तेली समाज सातारा जिल्ह्याचे वतीने मा. ना. जयदत्त (आण्णा) क्षीरसागर यांचा सत्कार

24 July 2019 Teli samaj 134 views

          मुंबई : महाराष्ट्र राज्याचे रोहयो व फलोत्पादन कॅबिनेट मंत्री व तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा ना जयदत्त आण्णा क्षीरसागर यांची मंत्री पदी निवड झाली बद्दल सातारा जिल्हा लिंगायत तेली समाजाचे वतीने मुबई मंत्रालय येथे सत्कार करण्‍यात आला व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्‍यात आल्या. सातारा जिल्ह्यातील तेली समाजाचे विशेषतः गावोगावच्या स्मशानभूमीचे प्रश्न व विविध समस्या सोडविणे बाबत सकारात्मक चर्चा झाली. येणारे काळात सातारा जिल्ह्यात तेली समाजाचा भव्य मेळाव्यास व सत्कारास उपस्थित राहणेच अभिवचन मंत्री महोदय यांनी दिले.त्यावेळी अखिल भारतीय तेली महासभेचे सदस्य श्री विजय संकपाळ, पश्चिम महाराष्ट्र सचिव अशोक संकपाळ, सातारा जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोखंडे, भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अँड विशाल शेजवळ, जिल्हा निमंत्रक डॉ सुधाकर बेंद्रे, औरंगाबादचे तेली समाज नेते श्री. गणेश पवार, जिल्हा उपाध्यक्ष श्री शंकरराव शेजवळ, श्री शिवलिंग दळवी, श्री सुनील विभूते व अनेक लिंगायत तेली सामाजिक बहुउद्देशीय संस्था पदाधिकारी, समाजबांधव उपस्थित होते.

Lingayat Teli Samaj Satara with Jaydutt Kshirsagar

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Oil Making