वधू - वर फॉर्म

वाल्ह्यात श्री संत संताजी जगनाडे महाराज पालखीला निरोप

24 July 2019 sant santaji maharaj jagnade 110 views

         वाल्हे, ता. २३ : श्री संत संताजी जगनाडे महाराज पालखी सोहळ्याचे सोमवारी सायंकाळी वाल्हे (ता. पुरंदर) येथे आगमन झाले. पालखी सोहळा तेली आळीमध्ये विसावला होता. मंगळवारी सकाळी पालखी सोहळा आळंदीच्या दिशेने मार्गस्थ झाला.  

         या वेळी पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पुरंदर तालुका भाजप अध्यक्ष सचिन लंबाते यांनी सोहळाप्रमुख अनिल राऊत यांचा पुष्पहार व श्रीफळ देऊन सन्मान केला. या वेळी शिरीष शहा, कुंडलिक पवार, सुनील राऊत, प्रकाश पवार, उत्तम पवार, किशोर पवार, पतंग शहा, जितेंद्र शहा, नागनाथ पवार, सुरेश राऊत उपस्थित होते. तेली समाजाच्या वतीने वैष्णवांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

Santaji Maharaj Palkhi leave form Velhe

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Mahasamund Sahu Samaj pratibha samman samaroh