Bride / Groom Form

वर्धा तेली समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा

01 August 2019 Teli samaj 98 views

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा व श्री. संताजी सेवा व सांस्कृतिक मंडळ, वर्धा जिल्हा यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा

         महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, वर्धा जिल्हा व श्री. संताजी सेवा व सांस्कृतिक मंडळ, वर्धा यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा कार्यक्रम दि. 28/7/2019 ला श्री. संताजी सभागृह, कृष्णनगर, शास्त्री चौक, वर्धा येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात नवनिर्वाचित खासदार श्री. रामदासजी तडस यांचा सत्कार व लाडुतुला करण्यात आली. तसेच वर्धा जिल्ह्य़ातील वर्ग 10/12 वीच्या शालांत परीक्षेत विशेष प्रावीण्य प्राप्त व शिक्षण क्षेत्रात उच्च शिक्षणात विशेष प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
         याप्रसंगी प्रामुख्याने श्री. सुरेशभाऊ वाघमारे, माजी खासदार, श्री. राजुभाऊ तिमांडे, माजी आमदार, माजी नगराध्यक्ष श्री. शेखरभाऊ शेंडे, माजी सभापती श्री. मिलींदभाऊ भेंडे, श्री. रविभाऊ बालपांडे, श्री. देवाभाऊ निखाडे, उपाध्यक्ष श्री. राजेश काळबांडे, उपाध्यक्ष, श्री. निळकंठजी पिसे, माजी जिल्हाध्यक्ष, श्री. सुरकार काकाजी, सौ. शोभाताई तडस, माजी नगराध्यक्ष व ईतर मान्यवर मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला कारंजा येथील सुमित बारई, रोशन भांगे, योगेश भांगे, आष्टी येथील श्री. धनराजजी हिरुडकर, अध्यक्ष,म.प्रा.तै.महासभा, श्री. गांजुड्डे सर, आर्वी येथील म.प्रा.तै.महासभाचे अध्यक्ष श्री. गणेशजी काळमोरे, श्री. अविनाशजी टाके सर, श्री. नानाभाऊ आसोले, श्री. भरतजी जैसिंगपुरे, प्रा. श्री. गोठाणे सर उपस्थित होते.

Wardha Teli Samaj gunvant Vidyarthi satkar sohala

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Amravati Teli Samaj Gunvant Vidyarthi Satkar