वधू - वर फॉर्म

श्री. संताजी जगनाडे महाराज यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयात साजरी करा महाराष्ट्र शासनाचे निर्देश

10 December 2019 sant santaji maharaj jagnade 132 views

     परळी वैजनाथ तेली समाज श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबरला सर्व शासकीय,निम शासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने नुकतेच परित्रक काढले आहे. त्यामुळे शहर व तालुक्यातील सर्व कार्यालयात जयंती साजरी करण्याचे आवाहन तेली युवक संघटना व शनैश्वर प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.

    सदंबरे जिल्हा पुणे येथील श्री संताजी जगनाडे महाराज हे तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्यातील प्रमुख टाळकरी होते. तसेच तुकाराम महाराजांची मुळ गाथा पाण्यात टाकण्यात आली होती. ती संपूर्ण गाथा श्री.जगनाडे महाराजांना मुखोद्गत होती. त्यांनी ही गाथा पुन्हा लिहून काढली. त्यामुळे श्री.संताजी महाराजांना मानणारा मोठा वर्ग संपूर्ण महाराष्ट्रात आहे.८ डिसेंबरला संताजी महाराजांचा जन्म दिवस साजरा करण्यात येतो.यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने नुकतेच परित्रक जारी केले असून यामध्ये सर्व शासकीय, निम शासकीय कार्यालयात ८ डिसेंबरला संताजी महाराजांची जयंती साजरी करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशाचे पालन शहर व तालुक्यातील सर्व शासकीय, निम शासकीय कार्यालयाने करावे असे आवाहन तेली युवक संघटना व शनैश्वर प्रतिष्टानच्या वतीने करण्यात आले आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Shri Sant Santaji Maharaj jagnade Punyathii amravati teli samaj