वधू - वर फॉर्म

श्री संताजी समाज विकास संस्थेतर्फे अमरावती तेली समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचे आयोजन

09 October 2019 teli samaj vadhu var melava 93 views

     अमरावती दि. ६ : श्री संताजी समाज विकास संस्थेतर्फे अमरावती जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व क्रीडा, सांस्कृतिक आणि नोकरी क्षेत्रात विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा सत्कार समारंभ स्थानिक अभियंता भवन व्ही.एम.व्ही. रोड अमरावती येथे रविवार दि. १३ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.

     समाजाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व नोकरी क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या समाज बांधवांचे कौतुक व्हावे, त्यांचे अभिनंदन करावे व त्यांच्या पुढील आयुष्यातील यशस्वी वाटचालीसाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे या मुख्य हेतूने श्री संताजी समाज विकास संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांना वर्ग १० वी मध्ये ८० टक्के पेक्षा जास्त गुण व वर्ग १२ वी डिप्लोमा व पदवी परिक्षेमध्ये ७५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले आहे. त्यांनी आपल्या मार्कशीटची सत्यप्रत व संबंधीत कागदपत्रे दि. १० ऑक्टोंबर पर्वी संस्थेच्या सभासदांकडे जमा करावी किंवा सुलभ कॉम्प्युटर इन्स्टिट्युट फिश-ओ-फिश समोर शिलांगण रोड अमरावती येथे जमा करावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय आसोले यांनी यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या नाव नोंदणीकरीता प्रा. डॉ. अनुप शिरभाते ९४२१८७४७८७, इंजि. मिलींद शिरभाते ९४२२१५५१११, इंजि. आशिष आगरकर ९८२३२२६२४१, अविनाश राजगुरे ९३२६९२५५३१ यांचेसोबत संपर्क साधावा.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Aali Bhakta Shrestha Shri Sant Santaji maharaj jagnade Marg Naamkaran