Bride / Groom Form

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयास संत जगनाडेंची प्रतिमा भेट

19 November 2019 sant santaji maharaj jagnade 104 views

     धुळे शासकीय आदेशानुसार तेली समाजाचे आराध्य दैवत थोर संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त ८ डिसेंबरला प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयात प्रतिमापूजन करण्यात येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर खानदेश तेली समाज मंडळातर्फे श्री संताजी जगनाडे महाराज यांची प्रतिमा जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांना भेट दिली. शासकीय व निमशासकीय कार्यालयांत श्री. संताजी जगनाडे महाराजांची प्रतिमा असणे आवश्यक आहे. शहरातील कार्यालयांना आवश्यक व मागणी केल्यास प्रतिमा भेट देण्यात येईल, असे खानदेश तेली समाज मंडळातर्फे कळविले आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष कैलास चौधरी, सचिव रवींद्र चौधरी, वाल्मीक महाले, भाऊसाहेब चौधरी, अमोल चौधरी, उमेश चौधरी, तुषार चौधरी, महेश बाविस्कर, योगेंद्र थोरात, महेश चौधरी, भटू चौधरी, सुभाष सोनवणे, किशोर बोरसे, गजेंद्र चौधरी, मुकेश चौधरी, रतिलाल चौधरी, प्रभाकर बागूल आदी उपस्थित होते. sant santaji jagnade maharaj image to Dhule Office Of District Collector

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Ajmer Sahu sena sanman samaroh