वधु - वर फॉर्म

तेली उद्योजक मार्गदर्शन शिबिर मुंबई

03 December 2019 Teli samaj 81 views

     तेली समाजोन्नती संघ, ता. चिपळुण व गुहागर, कार्यालय - वरळी, मुंबई-१८, आयोजित तेली उद्योजक मार्गदर्शन शिबिर तेली समाजातील मान्यवर उद्योजक आणि व्यवसायिक यांचा परिचय व्हावा व आपल्या सर्वांना त्यांच्या व्यवसायाची, उत्पादनाची माहिती मिळावी तसेच विद्यार्थी व तरुण वर्गाला प्रोत्साहन मिळावे व त्यातुनच उद्योजक घडावे, त्याचप्रमाणे समाजातील बंधु-भगिनी यांनाही याचा उपयोग व्हावा याकरिता आपल्या संघातर्फे सदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे.

      आपले पूर्वज हे व्यापारी होते मग आपण का नाही उद्योजक, व्यवसायिक, एजंसी यांची माहिती संकलन करुन पुस्तिका (Business Magazine) तयार करण्याचा संकल्प आहे. तसेच कार्यक्रमाच्या दिवशी हाॕलवर आपल्या उत्पादनाची  जाहिरात व स्टाॕल लावण्यासाठी पदाधिकारी यांचेकडे संपर्क करावा. सदर शिबिर कार्यक्रमाला आपण सहकुटुंब उपस्थित रहावे, हि विनंती  करण्‍‍‍‍‍यात  आलेली आहे.   संपर्कासाठी क्रमांक - प्रविण - 9323270386 नरेंद्र - 9833806570, उमेश - 8169804245 नितीन - 9702030546 गणेश - 9224792980 रविंद्र - 7709611275 कार्यक्रम वेळ - संध्याकाळी ४.०० ते ८.०० वा. कार्यक्रम स्थळ - भगवती बँक्वेटस

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

अभंग रक्षक श्री संत संताजी जगनाडे महाराज अभंग लेखन करताना | Sant Santaji Maharaj Writing Abhang