वधु - वर फॉर्म

शासन आदेशानुसार संत जगनाडे महाराज जयंती कार्यालयांमधून साजरी करा देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळाचे अधिकाऱ्यांना निवेदन

03 December 2019 sant santaji maharaj jagnade 48 views

शासन आदेशानुसार संत जगनाडे महाराज जयंती कार्यालयांमधून साजरी करा

देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळाचे अधिकाऱ्यांना निवेदन

Devgad taluka Teli Samaj Unnati Mandal Sant Jagnade Jayanti in government office     देवगड : देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळाच्यावतीने देवगडमधील विविध शासकीय कार्यालयात संत जनगाडे महाराजांची प्रतिमा भेट स्वरूपात देवून जनगाडे महाराजांची जयंती शासनाच्या आदेशानुसार ८ डिसेंबर रोजी कार्यालयात साजरी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

     देवगड तहसील कार्यालय, पंचायत समिती, पोलिस स्टेशन, नगरपंचायत या कार्यालयामध्ये प्रमिता व निवेदन देण्यात आले. नोव्हेंबर २०१८ मध्ये शासनाने तेली समाजाचे आराध्य दैवत संत श्री संताजी जनगाडे महाराज जयंती ८ डिसेंबर रोजी सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय, निम शासकीय कार्यालये यामध्ये साजरी करावी असे आदेश जारी केले आहेत.

     यासाठी देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळाच्यावतीने संताजी जनगाडे महाराजांची प्रतिमा शासकीय कार्यालय, शाळा व महाविद्यालयांना भेट देण्यात आली तसेच शासनाने जारी केलेल्या अध्यादेशाची प्रत देण्यात आली. तहसीलदार मारूती कांबळे, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, पोलिस निरिक्षक प्रणाली माने, नगराध्यक्ष प्रणाली माने यांची भेट घेत

     प्रतिमा व शासननिर्णयाची प्रत देण्यात आली. - शासनाने घेतलेला निर्णय तेली बांधवांसाठी आनंददायी आहे असे उद्गार तेली समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष अशोक तेली यांनी काढले. गजानन तेली, मधुकर कुवळेकर राजन तेली, प्रदीप वाडेकर, रविकार चांदोस्कर, प्रीती वाडेकर व तेल समाज बांधव उपस्थित होते.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sant Shiromani Sant Santaji Maharaj payi Wari sohala Aurangabad Teli Samaj