वधु - वर फॉर्म

संत जगनाडे महाराज जयंती साजरी करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

04 December 2019 sant santaji maharaj jagnade 63 views

संत जगनाडे महाराज जयंती साजरी करण्यात यावी यासाठी ज्ञानोपासना बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

       नाशिक - संत तुकाराम महाराजांच्या खांद्याला खांदा लावून सर्व समाज कार्य ज्यांनी केले असे महाराष्ट्राचे थोर संत आराध्य दैवत संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबर २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी असे आवाहन ज्ञानोपासना बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस. मॅडम यांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आले. जिल्हातील सर्व विभाग प्रमुखांना तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांना आपल्या स्तरावरून लेखी स्वरूपात आदेश देण्यात यावे अशी निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली याप्रसंगी ज्ञानोपासना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पिंगळे, विनायक कस्तुरे, श्रीकांत घोंगे, सचिन शिंदे, चंद्रकांत शिरसाट, तुषार शेलार, अक्षय व्यवहारे, विनय दिवेचा, अक्षय दुसाने आदी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

santaji jagnade maharaj jayanti Request to Collector of Nashik

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

lalu prasad yadav in Teli Samaj maha rally 26 February 1994