वधू - वर फॉर्म

श्री. संत संताजी महाराज जगनाडे जयंती निमित्‍त पिंपरी चिंचवड शहरातील विविध शासकीय कार्यालयानां संताजी महाराज जगनाडे यांची प्रतीमा भेट देण्यात आली.

04 December 2019 sant santaji maharaj jagnade 104 views

    तेली समाजाचे आराध्यदैवत श्री.संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती रविवार दि. 8 डिसेंबर रोजी सर्व राज्यभर साजरी होत आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात जयंती साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील विविध शासकीय कार्यालय पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, पी.एम.आर.डी.ए., तहसीलदार कार्यालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, या ठिकाणी सुदुंबरे संस्थानच्या वतीने  संताजी महाराज जगनाडे यांची प्रतीमा भेट देण्यात आली यावेळी सुदुंबरे संस्थानचे पदाधिकारी पोपटराव पिंगळे, आप्पा शेलार दत्तात्रय शेलार भिकाजी भोज विजय रत्नपारखी (भोसरी) सौ.सुलोचना कर्डिले, सुभाष कर्डिले, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. 

Teli Samaj Pimpri-Chinchwad gives snataji maharaj Images to government office of Pimpri-Chinchwad

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Ekta Rally MahaSammelan